नोटबंदी झाल्यापासून इ-कॉमर्स क्षेत्राला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. भारताची सर्वात मोठी डिजिटल बँक पेटीएम पेमेंट्स बँकेने या बँकेने 'पेटीएम का एटीएम' केंद्रे सुरू केली आहेत ज्यात ग्राहकांना बचत खाते उघडण्याची व त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याची किंवा खात्यात पैसे ठेवण्याची सुविधा मिळते.
पहिल्या टप्प्यात, पेटीएमने दिल्ली एनसीआर, लखनऊ, कानपुर, अलाहाबाद, वाराणसी आणि अलीगडसारख्या काही निवडक शहरांत 3000 एटीएम केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये स्थानिक बँकिंग प्रतिनिधी आहेत, जे ग्राहकांना त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात पैसे भरण्यास व त्यातून पैसे काढण्यास मदत करतील. दक्षिण आणि पूर्व भागांसह देशभरात आणखी 1,00,000 पेटीएम का एटीएम बँकिंग केंद्रे सुरू करून समस्त देशात बँकिंग सेवा विस्तारित करण्याचा कंपनीचा मानस आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रेणु सत्ती म्हणाल्या,“पेटीएम का एटीएम' बँकिंग केंद्रे हे प्रत्येक भारतीयाला बँकिंग सुविधा मिळाव्यात या दृष्टीने आम्ही टाकलेले पाऊल आहे. या सुविधेमुळे आमच्या ग्राहकांना त्यांच्या नजीकच्या विश्वसनीय केंद्रात जाऊन बँक खाते उघडता येईल, पैसे भरता, काढता येतील आणि आधार कार्ड संलग्न करता येईल. आमचा विश्वास आहे की,हे स्थानिक बँकिंग मॉडेल,आजवर वंचित राहिलेल्या व पुरेशा सेवा न मिळालेल्या लक्षावधी ग्राहकांना उत्तम दर्जाची बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल.”
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews